मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या दोन महिन्यापासून सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण होताना दिसत आहे. आज नववर्षाच्या तिस-या दिवशीही सोनं-चांदी स्वस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,170 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 62,400 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.
भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price Today) उतरताना दिसत आहे. यामुळे सोने-चांदी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. त्यामुळेचं सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी दिसून येतेय. सोनं स्वस्त झाल्याने सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचा सोन्याचा दर –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,570 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,100 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,170 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,170 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,170 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,170 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,400 रुपये (प्रति किलो).
Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 3 january 2022 sone chandi dar.