मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाली आहे. सध्या देखील सोन्या-चांदीचा भाव हा कमीच आहे. आज (मंगळवारी) सोने आणि चांदीचे दर स्थिर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोनं खरेदीसाठी ही एक योग्य वेळ आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,240 रुपयांपर्यंत स्थिर आहे. तर, चांदीची किंमत 62,300 रुपये प्रति किलोपर्यंत स्थिर आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव स्वस्त आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य संधी आहे. दरम्यान, भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर उतरताना दिसत आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर 50 हजाराच्या वर होता. यंदा तोच सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त असल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,950 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,220 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,220 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,220 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,300 रुपये (प्रति किलो).
Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 28 december 2021.