मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत असतात. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,750 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 68,900 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.
भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत होतं. मात्र, सध्या सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील महिन्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने ग्राहकांची बाजारात गर्दी दिसून येत होती. तरी देखील सध्या सोनं 50 हजाराच्या आतमध्ये आहे. त्यामुळे ग्राहक देखील सोनं खरेदी करण्यास पसंदी दर्शवतात. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,820 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,170 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,150 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,100 रुपये
आजचा चांदीचा भाव – 68,900 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 23 march 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Jitendra Awhad On ED | …तर मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही – जितेंद्र आव्हाड
Crime News | दुर्देवी ! हैदराबादमध्ये भंगार गोदामाला लागलेल्या आगीत 11 मजुरांचा होरपळून मृत्यू