मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) चढउतार दिसून आली आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीला सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं, दरम्यान त्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. सध्या सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण झाली आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 44,900 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,000 रुपये पर्यंत पोहचली आहै.
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत होते. दरम्यान, त्यानंतर आता सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाढणारा दर आता कमी होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा दर –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,000 रुपये (प्रति किलो)
Web Title : – Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 2 february 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | 10 वर्षाच्या मुलीला घरात बोलावून केला बलात्कार ; कोंढव्यातील धक्कादायक घटना