मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. गेली दोन दिवस सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याचा भाव जैसे थे तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज (बुधवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,090 रुपये आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 61रुपये पर्यंत पोहचली आहै.
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या चांदीचे दर आता वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,840 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये
आजचा चांदीचा भाव – 61,700 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 19 january 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update