मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोन्या चांदीचा दर कमीच आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,610 रुपये पर्यंत आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,400 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर (Gold Silver Price Today) उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी देखील दिसून येत आहे. गतवर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा दर कमी आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,650 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,610 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,610 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,610 रुपये
आजचा चांदीचा दर – 60,400 रुपये (प्रति किलो).
Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 11 january 2022 sonya chandi che dar.