मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. गेले काही दिवस झाले सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आली. दरम्यान आज पुन्हा सोन्याच्या भावात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली. तर चांदीचा दर स्थिर आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 50,500 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 71,000 रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, सोन्याच्या भावात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली. तर चांदीचा दर स्थिर आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या वर गेला आहे.
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
आजचा सोन्याचा भाव –
प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 50,500 रुपये
आजचा चांदीचा दर –
प्रति किलो – 71,000 रुपये
Web Title : Gold Silver Price Today | gold silver price today 11th april 2022 sonya chandi che dar
हे देखील वाचा :
Pune Crime | किरकोळ कारणावरुन तरुणीला अश्लील शिवीगाळ, वारजे माळवाडी पोलिसांकडून एकाला अटक
Pune Police | पुणे पोलिसांचा ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ पुरस्कार देऊन गौरव