मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने फेरबदल होत असतात. तर मागील काही दिवासांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सध्या सोन्याच्या किंमती वाढताना दिसत आहेत. तर चांदीच्या दरात घसरण होत आहे. आज (सोमवारी) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 48,280 रुपये आहे. तसेच, चांदीचा भाव (Silver Price) 65,600 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.
भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती (Gold Price) उतरल्या होत्या. आता मात्र सोन्याच्या भावात साधारण वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत आज सोन्याचा भाव कमीच आहे. अर्थात गेल्या वर्षी सोन्याचे दर 50 हजार रुपयाच्या वर होते. तर यंदा सोन्याचा दर 50 हजाराच्या खाली आहे. यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांना योग्य वेळ आहे.
दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,140 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,470 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,280 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,280 रुपये
आजचा चांदीचा भाव – 65,600 रुपये ( प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold rate price today on 22 november 2021 forecast outlook silver price rate today.
Digital Media | आयटी पॅनलची Fake News वर कायदा करण्याची शिफारस, हिवाळी अधिवेशनात होऊ शकते चर्चा
Nawab Malik | ‘कबूल है, कबूल है, कबूल है…’ ! नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर मध्यरात्री ‘फोटोबॉम्ब’
Pathankot | पठाणकोट : सैन्याच्या छावणीजवळ ग्रेनेड हल्ला; पंजाबासह सर्वत्र हायअलर्ट जारी