मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Gold Silver Price Today | मागील काही आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सातत्याने चढउतार पाहावयास मिळत आहे. मात्र मागील तीन दिवस सोन्याचा भाव जैसे थे दिसत आहे. मात्र, त्यामध्ये आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज सोन्याच्या किंमतीत 210 रुपयांची घट झाली आहे. याचबरोबर चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. आज चांदीच्या दरात 400 रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचा दर सध्या 47,660 रुपये तर, चांदीची किंमत 67,100 रुपये पर्यंत पोहचली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागच्या आठवड्याचा विचार करता सोन्याच्या भावात (Gold Price) घसरण आणि स्थिरता दिसून येते. 21 जुलैला 180, 22 जुलै 220, आणि 23 जुलैला 30 रुपयांची घट झाल्यानंतर पुढचे 3 दिवस सोन्याचा भाव स्थिर पाहायला मिळाला. नंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. दरम्यान, गतवर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यात आता जवळजवळ 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तसेच, मागील महिन्यात, 1 जून रोजी चांदीचा भाव (Silver Price) हा 72,600 रुपये इतका होता. त्यानंतर किंमतीत घट होऊन ती 70 हजारांच्या आत आलीय.
या दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झालीय. आणि डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला आहे. म्हणून सोन्याच्या दरात वारंवार घट होत आहे. मागील 2 महिन्यात सोन्याच्या किमतीत (Gold Price) घसरण झाली आहे. मात्र, आगामी काळात भाव वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
मुंबई आणि पुण्यातील सोन्याचा भाव – (Gold Price)
24 कॅरेट सोन्याचा दर : 47,660 रुपये
22 कॅरेट सोन्याचा दर : 46,660 रुपये
चांदीची किंमत – (Silver Price)
एक किलो प्रमाणे : 67,100 रुपये
Web Title :- gold silver price today gold rate fall by rs 210 and silver rate fall by rs 400
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Tokyo Olympics 2020 | टोक्यो ऑलंपिकमध्ये पी. व्ही. सिंधुची विजयी घोडदौड