नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत वारंवार बदल होताना दिसत आहे. मागील चार दिवस झाले सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. दरम्यान आता सोन्या – चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज (सोमवारी) सोन्याच्या किंमतीत 155 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे सध्या सोनं (Gold Price) 51,513 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price) 316 रुपयांची घट होऊन चांदी 68,511 रुपयापर्यंत ट्रेड करत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोने आणि चांदी दोन्हींच्याही व्यापाराला घसरणीसह सुरुवात झाली आहे. दरम्यान, वीस दिवसांतच सोन्याच्या किंमतीत 4,087 रुपयांची घसरण झाली आहे. याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याचा दर 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला होता.
दरम्यान, भारतीय सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहे. दरम्यान, सध्या बाजारात सोन्या – चांदीच्या दरात घसरण होत असली तरी, जागतिक बाजारात मात्र सोन्या – चांदीच्या किंमतीत वाढ होत आहे.
सोन्याची स्पॉट दर 0.28 टक्क्यांनी वाढून 1,948.80 डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याचबरोबर चांदीचा स्पॉट दर 0.70 टक्क्यांनी वाढून 25.44 प्रति औंस पर्यंत पोहचला आहे.
Web Title :- Gold Silver Price Today | gold price today gold price slashed heavily in last 20 days silver rate also down know the latest rates
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
PSI | शेतकऱ्याची लेक झाली PSI, आई-बाबांचे स्वप्न केले पूर्ण
PM Kisan योजनेसाठी घर बसल्या करता येणार eKYC; जाणून घ्या प्रक्रिया
Increase Breast Size | 5 आहार, जे ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी आहेत उपयोगी, जाणून घ्या कोणते