मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर (Gold Silver Price Today) बदलत असतात. त्याच प्रमाणे मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज देखील सोन्या चांदीचे दर कमीच आहे. आज (शुक्रवारी) सोन्याची किंमत 0.06 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह आज 47,481 रुपये प्रति तोळा आहे. तर, चांदी 0.04 टक्क्यांनी घसरले. या घसरणीनंतर 1 किलो चांदीचा दर 60,402 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी सोन्याच्या किंमतीत (Gold Silver Price Today) 0.06 टक्क्यांची किंचित वाढ झाली असली तरी सोन्याचे दर हे कमीच आहेत. भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर उतरताना दिसत आहे. अधिक दिवसांनंतर आज सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. तरीही सध्या सोनं स्वस्त आहे.
दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तर, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
24 कॅरेट सोन्याचा भाव –
मुंबई – 48,820 रुपये
पुणे – 48,650 रुपये
नाशिक – 48,650 रुपये
नागपूर – 48,820 रुपये
22 कॅरेट सोन्याचा भाव –
मुंबई – 46,820 रुपये
पुणे – 46,130 रुपये
नाशिक – 46,130 रुपये
नागपूर – 46,820 रुपये
चांदीचा दर (प्रति किलो) –
मुंबई – 60,400 रुपये
पुणे – 60,400 रुपये
नाशिक – 60,400 रुपये
नागपूर – 60,400 रुपये
Web Title : Gold Silver Price Today | gold price today down by 8700 rupees from record high on 07 january 2022 silver slumps check rates.
Pune Crime | चुलत भावाचा खून करुन मृतदेह पुरला शेतात, पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्ह्याची उकल