नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Price Today |आंतरराष्ट्रीय बाजारातील (international market) दर उतरल्याने आज 6 ऑगस्ट रोजी देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर (Gold-Silver Price Today) घसरले आहेत. यामळे सोन्याचे दर पुन्हा एकदा 47 हजारांपेक्षा कमी झाले आहेत. तर चांदीचे दर (Gold-Silver Price Today) देखील आज घसरले आहेत. आधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46 हजार 853 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 66 हजार 175 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोन्याचे नवीन दर
दिल्लीमध्ये (Delhi) आज (शुक्रवार) सोन्याचे दर 288 रुपयांनी कमी होऊन सोन्याचा दर (gold price) 46 हजार 570 रुपये प्रति तोळावर पोहचले.
आधीच्या सत्रात चांदीचे दर (silver price) 66 हजार 175 रुपये प्रति किलो होते.
यामध्ये 661 रुपयांची घसरण होऊन चांदीचा दर 65 हजार 514 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1799 डॉलर प्रति औंसवर पोहचले आहेत.
तर चांदीचे दर 25.15 डॉलर प्रति औंसवर आहेत.
सोने 60 हजारंवर पोहचण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 48 हजार 500 रुपये प्रति तोळापर्यंत जाऊ शकतात.
याशिवाय यावर्षी सोन्याचे दर 60 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता सोन्याचे दर कमी असल्याने सोने खरेदीची चांगली संधी आहे.
भविष्यात सोन्याचे दर वाढल्यानंतर गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळेल.
90 हजार रुपये स्तरावर पोहचेल सोने
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) महामारीमुळे सोन्याच्या दरात चढ उतार पहायला मिळत आहेत. व्हॅक्सिनेशन प्रक्रिया जगभरात सुरु झाल्यानंतर यामध्ये अधिक प्रमाणात चढ उतार होत असल्याचे पहायला मिळत आहे.
अशावेळी 25 कोटी डॉलरच्या क्वाडरिगा इग्नियो फंड (Quadriga Ignio Fund) सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला (Diego Parilla) यांचे म्हणणे आहे.
सोन्याचे दर पुढील 3 ते 5 वर्षात सध्याच्या दरापेक्षा दुप्पट होतील.
त्यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 3 ते 5 हजार डॉलर प्रति औंसवर पोहचू शकते.
या अंदाजाने भारतात सोन्याचे दर 90 हजार रुपये प्रति तोळा पर्यंत पोहचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Web Title : Gold-Silver Price Today | gold price today and silver price today on 6th august 2021 check latest rates up
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
MS Dhoni | … म्हणून MS धोनीच्या Twitter अकाऊंटवरून ‘ब्लू टिक’ हटवली