नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सध्या जोरदार घसरण सुरू आहे. अशावेळी जर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.05 टक्के घसरण नोंदली गेली. तर चांदीचा दर (Silver price) 0.19 टक्केच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
सोन्याचा आजचा दर (Gold Price)
डिसेंबर डिलिव्हरीचे सोने आज 0.05 टक्के घसरणीसह 46,497 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चांदीचा आजचा दर (Silver Price)
आजच्या व्यवहारात चांदी 0.19 टक्के घसरली आहे. आज 1 किलो चांदीचा दर 59,504 रुपये आहे.
सोने सर्वोच्च स्तरापासून 9,700 रुपये स्वस्त
2020 च्या समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहचला होता. आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 46,497 रुपये प्रति 10 ग्रॅमच्य स्तरावर आहे, म्हणजे अजूनही सोने सुमारे 9,700 रुपये स्वस्त मिळत आहे.