नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीन दरम्यान सुरु असणाऱ्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम होत असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच राजधानी दिल्लीतील सराफ बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सलग दुसर्या दिवशी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत ३२२ रुपयांवर गेली. त्याचबरोबर चांदीच्या दरात ६७६ रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.
नवीन सोन्याच्या किंमती –
बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये ९९.९ टक्के सोन्याच्या किंमती प्रति दहा ग्रॅम ३८,९६७ रुपये वरून ३९.२९९ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहेत. यावेळी सोन्याच्या दरात दहा ग्रॅम ३३२ रुपयांची वाढ झाली आहे.
– बुधवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस १,४८३ डॉलर झाला आणि चांदीची किंमत १७.२७ डॉलर प्रति औंस झाली. बुधवारी सोन्याच्या किंमतीत झालेली वाढ या महिन्यातील सर्वाधिक आहे.
– यापूर्वी मंगळवारी ९९.९टक्के सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम ३८,७०९ रुपयांवरून वाढून, ३८,७८९ रुपये प्रति दहा ग्रॅम होते. त्याचबरोबर दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोमवारी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३८,८७९ रुपयांवरून ३८,७१८ रुपयांवर आला.
चांदीच्या किंमतीत वाढ –
सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही मोठी उडी आली आहे. बुधवारी दिल्ली मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत ४५,९९६ रुपयांवरून ४६,६७२ रुपयांवर गेली आहे. औद्योगिक युनिट्स आणि नाणे व्यापाऱ्यांच्या खरेदीत वाढ झाल्याने चांदीच्या किंमती प्रति किलो ६७६ रुपयांनी वाढल्या आहेत.
दरम्यान, एचडीएफसी सिक्युरिटीचे ज्येष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पुढील वर्षी अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा अहवाल आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतरच हा करार होईल अशी अपेक्षा आहे. म्हणूनच जगभरातील गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी सुरू केली आहे.
visit : bahujannama.com