नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Silver Price Today | सातत्याने चढउतार होणाऱ्या सोन्याच्या दरात (Gold Silver Price Today) मागील काही दिवस घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या किमतीत देखील किरकोळ घसरण झाली. मात्र, सध्या सोन्याच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX ) नुसार सोन्याचा वायदे किंमत 0.08 टक्के अर्थात 37 रुपयांनी वाढून तो 46, 977 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचली आहे. तर, चांदीची किंमत 0.09 टक्के अर्थात 56 रुपयांची घसरण झाली आहे. यांनतर सध्या चांदीचा भाव 63,182 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गतवर्षी सोन्याचा भाव (Gold Price) उच्चांकी स्तरावर होता, साधारण 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. मात्र, गेल्या वर्षीची तुलना करता यंदा सोन्याच्या भावात (Gold Price) 9223 रुपयांची घसरण आहे. या दरम्यान, गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात साधारण 950 रुपयांची घसरण झालीय.
तसेच, चांदीच्या किंमतीत (Silver Price) साधारण 4100 रुपयांची घसरण झालीय.
कोरोना, डेल्टा प्लस वेरिएंटच्या वाढत्या प्रभावामुळे व्यावसायिक लोक चिंतेत आहेत.
शुक्रवारी शुद्ध सोन्याचा दर 46,702 रुपये 10 ग्रॅम इतका होता.
तर चांदीचा भाव 62,612 रुपये प्रति किलोग्रॅम होता.
अशी माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन दिलीय.
या दरम्यान, सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today) फक्त मिस्ड कॉलच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या सेमेजमध्ये सोन्याच्या आताच्या दराबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे.
तसेच, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार केलं आहे.
‘BIS Care app’ असं या App चं नाव असून ग्राहकाच्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकणार आहे.
Web Title : Gold Silver Price Today | gold price hike while silver falls check todays 16 august 2021 gold rate
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
RBI Rules | चेक देण्यापूर्वी करू नका ही चूक, अन्यथा भरावा लागेल दंड! जाणून घ्या RBI चे नवीन नियम
Pune Crime | कुंजीरवाडीच्या सरपंच अंजु गायकवाड यांना ‘मोक्का’ न्यायालयाकडून जामीन मंजूर