नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Price Today | दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात आज म्हणजे 18 नोव्हेंबर 2021 ला किंचित तेजी दिसून आली. तर, चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) आज घसरण झाली आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली बाजारात सोने 48,175 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 65,268 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोन्याचा आजचा दर (Gold Price Today)
दिल्लीत सोने 21 रुपयांनी वाढून 48,196 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. मागील व्यवहाराच्या सत्रात सोन्याचा दर 48,175 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोने तेजीसह 1,869 रुपये प्रति औंसवर राहिले तर चांदी 25.09 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली.
चांदीचा आजचा दर (Silver Price Today)
चांदी 121 रुपयांच्या घसरणीसह 65,147 रुपये प्रति किलोग्रॅमवर आली. इंटरनॅशनल मार्केटमध्ये चांदी 25.09 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिली.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.
हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा. (Gold-Silver Price Today)
Web Title :- Gold-Silver Price Today | gold gains marginally silver declines rs 121