नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉलरच्या तुलनेत रुपया वाढल्यानंतर सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात तेजी दिसून आली आहे. सोन्यासह चांदीच्या भावातही वाढ दिसून आली. सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ७३.३५ वर मजबूत झाला. या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती समतल दिसल्या.
सोन्याचा नवीन भाव
सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव २५८ रुपयांनी वाढला. यानंतर नवीन भाव आता ५१,८७७ रुपये प्रति १० ग्रामवर पोहोचला आहे. या अगोदर सोन्याचा भाव ५१,६१९ रुपये प्रति १० ग्रामवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात समतल व्यापारासह सोन्याचा भाव १,९३२ डॉलर प्रति औसवर राहिला.
चांदीचा नवीन भाव
चांदीच्या भावातही आज ८३७ रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. यानंतर आता चांदी ६९,४४८ रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. या अगोदर चांदीचा भाव ६८,६११ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव २६.९३ डॉलर प्रति औसवर होता.
काय आहे तज्ञांचे मत?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन बाजारात व्यापार नसतानाही देशांतर्गत बाजारात सोन्याचा व्यापार कमी प्रमाणात दिसून आला. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी म्हणतात की, आशियाई बाजार सोमवारी समतल झाला. कामगार दिनाच्या सुट्टीच्या निमित्ताने अमेरिकन बाजारपेठा बंद राहिल्या. हेच कारण आहे की, आज सोन्याच्या किंमतींमध्ये चढ-उतार नव्हते.
BIS App च्या माध्यमातून सोन्याची शुद्धता तपासा
ग्राहक आता बीआयएस अॅपद्वारे वस्तूंची सत्यता तपासू शकतील. वस्तूंशी संबंधित कोणतीही तक्रार, परवाना, नोंदणी आणि हॉलमार्कची सत्यता आता बीआयएस अॅपद्वारे तपासली जाईल. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी गेल्या महिन्यातच बीआयएस केअर अॅप लॉन्च केले होते. या अॅपमध्ये जर वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळला, तर ग्राहक त्याची तक्रारही त्वरित करू शकतो. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदवण्याची माहिती मिळेल.