नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) मागील काही दिवसांपासून घसरण नोंदली जात होती, ज्यामुळे ते केवळ 2 आठवड्यात 2000 रुपयांनी स्वस्त झाले. मात्र, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मागील दोन दिवसांपासून सोन्यात वाढ दिसून येत आहे. काल शुक्रवार 13 ऑगस्टला सोन्याचा दर 0.24 टक्केच्या वाढीसह 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. तर, चांदीचा दर सुद्धा 0.30 टक्के वाढला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
2 आठवड्यापूर्वी होते 48,390 रुपये प्रति 10 ग्रॅम
जर दोन आठवड्यापूर्वी पाहिले तर सोन्याचा दर 48,390 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 67,976 रुपये प्रति किलो होता.
तर काल सोन्याचा भाव 46,476 रुपये प्रति 10 ग्रॅ आणि चांदी 62,044 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होती.
विक्रमी स्तरापासून 9724 रुपये आहे स्वस्त
एमसीएक्सवर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 56,200 रुपयांच्या उच्च स्तरावर पोहचला होता.
त्या हिशेबाने सोने विक्रमी स्तरापासून आजही 9,724 रुपये स्वस्त आहे.
Web Title : gold silver price today 10 gram gold rate rs 46476 check your city price
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Corona in India | चिंताजनक ! देशात मागील 24 तासांत 38,667 नवे बाधित, 478 जणांचा मृत्यू