बहुजननामा ऑनलाइन टीम –मागील सत्रात मोठी घट झाल्यानंतर आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. एमसीक्सवर ऑक्टोबरचा सोन्याचा वायदा भाव ०.२३ टक्क्याने वाढून ५०,९४० रुपये प्रति १० ग्राम होता. तर चांदीचा वायदा भाव ०.७५ टक्क्याने वाढून ६८,७७० रुपये प्रति किलोग्रॅम झाला.
मागील दोन दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या वायदा भावात घट नोंदवली जात होती. बुधवारी सोन्याचा वायदा भाव ६५० रुपये प्रति १० ग्रामने घसरला होता, तर चांदीचा भाव २,६५० रुपये प्रति किलोग्रॅम कमी झाला होता. भारतात सोन्याचा भाव मागील महिन्यात ५६,२०० रुपये प्रति १० ग्रामच्या विक्रमी पातळीवर गेला होता.
जागतिक बाजारात असा होता भाव
जागतिक बाजारात मागील सत्रात १.४ टक्के घट झाल्यानंतर आज आज सोन्याचा भाव सपाट होता. जागतिक आर्थिक सुधारणांच्या चिंतेत हाजीर सोन्याचा भाव ०.१ टक्क्याने वाढून १,९४४.५८ डॉलर प्रति औसवर स्थिर राहिला. बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या खासगी मालकांनी ऑगस्टमध्ये अपेक्षेपेक्षा कमी कामगार कामावर ठेवले.
इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी ०.१ टक्क्याने घसरून २७.४८ डॉलर प्रति औसझाली, प्लॅटिनम ०.१ टक्क्याने घसरून ९०६.६९ डॉलर आणि पॅलेडियम ०.३ टक्क्याने घसरून २,२४१.१० डॉलरवर आले.
यामुळे किंमतीवर परिणाम झाला
मजबूत अमेरिकन डॉलरने सोन्याच्या किंमतींवर दबाव आणला. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरच्या कामगिरीचे मोजमाप करणारे डॉलर निर्देशांक ९२.८५२ वर पोचले आहे, ज्यामुळे अन्य चलनांच्या धारकांसाठी सोने महाग झाले. दुसरीकडे अतिरिक्त अमेरिकन उत्तेजनामुळेही सोन्याला पाठिंबा मिळाला. महत्वाचे म्हणजे राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक मानले जाते.