नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेअर बाजारानंतर आता जगभरात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. एका वृत्तसंस्थेनुसार कोरोना व्हायरसमुळे व्यवसाय कार्याची गती कमी होत चालली असून शेअर बाजारातील घसरण आपोआपच नुकसानातून वर येण्यासाठी गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी सोन्याची किंमत ५ टक्के कमी झाली होती. २०१३ नंतर सोन्याच्या किंमतीत एका दिवशी मोठी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारातही दिसून येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण सोने महागल्यामुळे सामान्य लोकांना लग्नाच्या सीजनमध्ये खरेदीपासून कमी केली आहे. मागच्या आठवड्यात तीन दिवसात सोने १००० रु. प्रति ग्रॅमने जास्त स्वस्त झाले होते. पुढेही किंमतीत ३००० रु. प्रति ग्रॅम पर्यंत घसरण होऊ शकते.
सोने – चांदीच्या प्लॅटिनमच्या किंमतीत लक्षणीय घट
एका अहवालानुसार शुक्रवारी सोने ४.५ टक्क्यांनी खाली येत १५७१ डॉलर प्रति औस झाले होते. ही जून २०१३ नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. तसेच चांदी आणि प्लॅटिनमच्या किंमतीत २००८ साली सर्वात मोठी घट झाली होती.
किती स्वस्त होणार सोने ?
केडिया कमोडिटीचे एम.डी. अजय केडिया यांनी सांगितल्यानुसार नफावसुलीमुळे जागतिक बाजारात सोन्याची किंमत खाली आली आहे. पुढच्या आठवड्यात खालच्या स्तरावर काही प्रमाणात पुनर्प्राप्ती होऊ शकते. पण मोठ्या तेजीची अपेक्षा नाही. देशांतर्गत बाजारातही सोने ५-७ टक्के स्वस्त होऊ शकते. केडिया यांनी सांगितले की, सराफा बाजारात सोन्याची किंमत ४३ हजार प्रति १० ग्रॅमने खाली येऊन ३९ हजार रु प्रति १० ग्राम पर्यंत येऊ शकते.
बर्याचदा मार्च महिन्यात घटतात सोन्याच्या किंमती –
केडिया म्हणतात की, गेल्या दहा वर्षातील आकडेवारी पाहिल्यास सोन्याच्या किंमती मार्चमध्ये बर्याचदा खाली आल्या आहेत. २०१२ आणि २०१८ असे वर्ष आहे, जेव्हा सोन्याच्या किंमती खाली आल्या नाहीत.