बहुजननामा ऑनलाईन – जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. आज एमसीएक्स वर सोन्याचे भाव स्थिर आहेत. सोन्याचा प्रतितोळा दर 44,897 रुपये आहे तर चांदीच्या भावात आज 0.16 टक्क्यांची घसरण झाली आहे. यानंतर चांदीचे दर 65,140 रुपये प्रति किलो झाले आहेत. आधीच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात किरकोळ वाढ पहायला मिळाली होती.
आज आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील सोन्या-चांदीचे दर स्थिर झाले आहेत. अमेरिकन बाजारात आज स्पॉट गोल्डची किंमत 1,734.81 डॉलर प्रति औंस आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
सोन्याचा भाव मुंबई आणि कोलकात्यात अनुक्रमे 45030 रुपये आणि 46880 रुपये प्रतितोळा आहेत. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 48070 रुपये प्रतितोळा आहेत. चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 46150 रुपये प्रति तोळा आहे.
11500 रुपयांनी स्वस्त झाले दर
सोन्याचा भाव गेल्यावर्षी सर्वोच्च स्तरावर गेल्यानंतर त्याच्या तुलनेत आता सोन्याचा भाव 11500 रुपयांनी कमी झाला आहे. पँडेमिकमध्ये सोन्याची किंमत 55 हजारांपेक्षा जास्त होती. लसीकरणानंतर आता सोन्याचे भाव कमी झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आर्थिक व्यवहारांनी तेजी पकडल्यानं सोन्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाला आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.
यावर्षी सोन्याचे दर नवा रेकॉर्ड करू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सोन्याची किंमत 2021 मध्ये 63000 रुपयांच्या स्तरावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असं झालं तर गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळेल.