बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोना काळात सोनं गुंतवणूकदारांची संख्या वाढली. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. (Gold Rates)ऐन सणासुदीच्या काळात कमी झालेले सोन्याचे दर पुन्हा वाढू लागल्याने सामान्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. लग्नसराई व लहान मुला, मुलींना सोन्याचे दागिने घ्यायचे आहेत, परंतू सोन्याचे वाढलेले दर उरात धडकी भरवत आहेत. कुठूनतरी सोन्याचे दर एवढ्याने कमी होणार किंवा झाले अशी माहिती समोर येते आणि हायसे वाटते. मात्र, गेल्या तीन दिवासांपासून सोन्यान पुन्हा उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे सोन्याची चमक अचानक गायब होऊ लागल्याचं दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये सोने २६०० रुपयांहून स्वस्त झाले आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने ४००० रुपयांनी स्वस्त झालं आहे.
पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी, फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमती घसरण्याची (Gold Price down) आशा व्यक्त केली जात आहे. २०२१ च्या सुरुवातीला सोने ४२,००० प्रति ग्रॅम होण्याची शक्यता आहे. असे का होईल? याच्यामागे अनेक कारणे आहेत. मात्रस सर्वात मोठे कारण हे कोरोना आणि त्याला रोखण्यासाठी बनविण्यात येत असलेली लस हे आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली आहे. एकट्या नोव्हेंबरमध्येच सोने ४००० रुपयांनी घटले आहे. तर ऑगस्टपासून सोने ८००० रुपयांनी घसरले आहे. आता सोन्याच्या किंमतीबाबत (Gold Price in India) भारतीय बाजारात चांगले संकेत मिळत आहेत. २०२० संपायला एकच महिना राहिला आहे. म्हणजेच पुढील दोन महिन्यांत सोन्याच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. आज एमसीक्सवर बाजार उघडला तेव्हा फेब्रुवारीच्या सोन्याचा दर कालच्यापेक्षा १२३ रुपयांनी जास्त होता.
दरम्यान, बुधवारी सोने ४९५९७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. आज सोने ४९७२० रुपयांवर उघडले. आता सोन्याचा दर ३७० वाढून ४९९६७ रुपयांवर ट्रेड करत आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ झालेली असून सध्या चांदी ६७६२२. ०० वर ट्रेड करत आहे. सध्या चांदीच्या दरात १७११ रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारात किंमती वाढल्याने बुधवारी दिल्लीच्या सराफा बाजारातही सोने २१५ रुपयांनी वाढले होते. एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,८५४ डॉलर प्रति औंस तर चांदी २४.७२ डॉलर प्रति औंस वर होती.