मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Rate Today । मागील काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-silver rates) चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात घट पाहायला मिळाले आहे. मात्र, आता सोन्याच्या दरात वाढ दिसून आली आहे. आज प्रति 10 ग्रॅम 320 रुपयांची सोन्याच्या दरात (Gold Rate) वाढ झाली आहे. आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Rate) 46,000 रुपये इतकी आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी जवळपास 47,000 हजार रूपये पर्यंत पोहचलं आहे.
सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Rate) वाढ झाली असली तरी ग्राहकांची मागणी देखील तितकीच आहे. त्यात काही बदल दिसून येत नाही. विशेष म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56, 200 रूपयांवर पोहचला होता. आता सोन्याची किंमत 9,000 रूपयांनी घसरले. म्हणून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, 320 रुपयांनी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव दर 60,000 रूपयांवर पोहोचतील असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.
शहरांमधील सोन्याचा भाव –
मुंबई :
22 कॅरेट – 46,750 रुपये
24 कॅरेट – 47, 750 रुपये
चेन्नई :
22 कॅरेट – 45, 200 रुपये
24 कॅरेट – 49, 310 रुपये
दिल्ली :
22 कॅरेट – 46, 550 रुपये
24 कॅरेट – 50, 550 रुपये
कोलकाता :
22 कॅरेट – 47, 500 रुपये
24 कॅरेट – 49, 750 रुपये
शहरांमधील चांदीचा भाव –
मुंबई – 69, 600 रुपये
चेन्नई – 74, 100 रुपये
दिल्ली – 69, 600 रुपये
कोलकाता – 69, 600 रुपये.
web title: Gold Rate Today. Gold prices rebound by Rs 9,000, find out today’s rates
Anti Corruption Bureau । 2 हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात