बहुजननामा ऑनलाइन टीम – आज भारतीय बाजारात सोन्या(Gold)-चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. एमसीएक्सवर डिसेंबरच्या वायदा बाजारात सोनं(Gold) 252 रुपयांनी वाढून 51142 रुपये प्रतितोळा झालं आहे. सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. तर चांदीची किंमत 436 रुपयांनी वाढून 64122 रुपये प्रित किलो झाली आहे.
जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घट नोंदवली आहे. मजबूत असलेला अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन प्रोत्साहन पॅकेजबाबतच्या अनिश्चिततेनं सोन्यावर दबाव टकला आहे. सुरुवातीच्या सत्रात 1932.96 डॉलरवर गेलेल्या सोन्याचे दर 0.2 टक्के घट नोंदवत 1925.29 डॉलर प्रति औंसवर आले. डॉलरमध्ये 0.7 टक्क्यांची वाढ झाल्यानं अन्य चलनांच्या देशांसाठी सोनं महाग झालं.
अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजवर अनिश्चितता कायम आहे. चांदी 0.4 क्क्यांनी घटली आहे तर प्लॅटीनम 1 टक्के घटून 876.80 डॉलरवर आलं होतं. पॅलेडियम 0.2 टक्के घटून 2435.35 डॉलरवर आलं आहे.
एमसीएक्स आणि लोकल दर वेगळे का ?
चंद्रशेखर टिळक म्हणतात, “होलसेल प्राईज इंडेक्स आणि रिटेल प्राईज इंडेक्स असतो. त्यामुळंच हे दर वेगळे असतात. एमसीएक्सवर जे दर असतात तिथं आपल्याला सोन्याची डिलिव्हरी मिळत नाही. कमॉडिटी मार्केटचा जो रेट आहे त्यानुसार तिथून आपण डिलिव्हरी घेतो. त्यामुळं हे दर वेगळे असतात.”
सोनं 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा हे कसं ठरलं ?
टिळक म्हणतात, “1 तोळा सोनं हे 10 ग्रॅम दशमान पद्धतीत बसवणं सोपं जातं. अक्ख्या जगात तशीच पद्धत आहे. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. त्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर दर निश्चित करणं सोयीस्कर ठरतं.”