नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशांतर्गत बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया खाली आल्यामुळे सोने सलग दुसऱ्या दिवशीही महागले आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोने ६ रु. नी महागले असून चांदी ५८ रु. नी घसरली आहे. तर सोमवारी दिल्लीत सोने ३९१ रु.नी महाग आणि चांदी ७१३ रु.नी स्वस्त झाली होती.
काय आहेत सोन्याचे दर? – दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोने ६ रु.नी महागले असून आज सोन्याचा दर ४२,९५८ रु. प्रति १० ग्राम आहे. सोमवारी हाच दर ४२,६१६ रु. प्रति १० ग्राम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने १,५९५ डॉलर प्रति २८.३४ ग्राम आहे.
काय आहेत चांदीचे दर? – दिल्लीच्या सराफा बाजारात चांदी ४६,२१३ रु. प्रति किलोग्रॅम असून आज चांदी ५८ रु.नी स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी १७ डॉलर प्रति २८.३४ ग्राम झाली आहे.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट तपन पटेल म्हणाले की, रुपया घसरल्याने सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती कमी झाल्यामुळे तेजीला ब्रेक लागला आहे. येणाऱ्या दिवसात अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्वने जर व्याज दरात कपात केली तर सोन्याच्या किंमती वाढू शकतात.
असे निश्चित होतात तुमच्या शहरातील सोन्याचे दर –
1) बाजारात तुम्ही ज्या किंमतीने सोन्याचे दागिणे खरेदी करतात तेथेच हाजिर भाव निश्चित होतात. अनेक शहरातील सराफ असोसिएशनचे सदस्य मिळून बाजार सुरु होण्यापूर्वी दर निश्चित करतात.
2) एमसीएक्स वायदा बाजारात सोन्याचे जे दर येतात ते व्हॅट, लेव्ही किंवा घडणावळ सोडून घोषित केले जातात. तेच दर दिवसभर सुरु राहतात. काही वेळा विविध शहरात सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात. शिवाय स्पॉट मार्केटमध्येही सोन्याच्या किंमती शुद्धतेच्या आधारे निश्चित केल्या जातात.
3) २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.
एमसीएक्सवर कसे निश्चित होतात दर –
1) भारतीय बाजारात सोन्याच्या मागणीवरुन सोन्याचे दर निश्चित केले जातात.
2) लंडन स्थित बुलियन मार्केट असोसिएशनसह समन्वय करत सोन्याच्या किंमती निश्चित केल्या जातात. वायदा बाजार संपूर्ण देशात एकसारखा असतो.