नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसची चिंता वाढली असून सोन्याचा भाव आतापर्यंत सर्वात वरच्याव स्तरावर पोहोचला आहे. शेअर बाजारात घट झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणुक म्हणून गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे. यामुळे बुधवारी दिल्ली सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १,१५५ रुपयांची वाढ झाली असून दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. एक किलो चांदीची किंमत १,१९८ रुपयांनी वाढली आहे. अमेरिकेत कमी व्याज दर आणि कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या दहशतीमुळे गुंतवणूकदार वातावरणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. यामुळेच किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
सोन्याचा नवीन भाव –
बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ४३,२२८ रुपये प्रति १० ग्रामने वाढून ४४,३८३ रु. प्रति १० ग्राम झाली आहे. यामुळे किंमत १,५५५ रु. वाढली आहे. मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात १० ग्राम सोन्याचा भाव ६ रु.नी वाढून ४२,९५८ रु. प्रति १० ग्रामवर पोहोचला होता.
चांदीचा नवीन भाव –
सोन्यासह चांदीच्याही किंमतीत वाढ झाली आहे. चांदीची किंमत ४६,५३१ रु.नी वाढून ४७,७२९ रु. प्रति किलोग्रॅम झाली आहे. यादरम्यान १,१९८ रु. प्रति किलोग्रॅम वाढली आहे.