नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाउनमुळे सर्व आर्थिंक व्यवहार ठप्प असल्यामुळे नागरिकांकडून काहीही खरेदी केली जात नाही. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे सोने खरेदी करताना नागरिकांना आर्थिंक ताण सहन करावा लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमत प्रति तोळा 47 हजारांवर पोहोचली होती. आता यामध्ये 881 रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा सोन्याची किंमत 47 हजार948 रुपये इतकी झाली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे देशभरातील सराफा बाजार बंद आहेत. वाढत्या संक्रमणाचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. त्याचप्रमाणे अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावामुळे शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्याचा देखील मोठा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 881 रुपयांनी वाढून प्रति तोळा 47 हजार 948 रुपये इतक्या झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या किंमती सोमवारी 275 रुपयांनी वाढल्या आहेत.
याठिकाणी सोन्याचे दर 47 हजार 656 रुपये प्रति तोळा झाले आहेत. त्याचप्रमाणे एमसीएक्सवर चांदीचे भाव 3 टक्क्यांनी वाढल्यामुळे चांदी 48,053 प्रति किलोग्राम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही ऑक्टोबर 2012 नंतर आज सोन्याचे दराने उच्चांक गाठला आहे. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाची चिंता आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेत आलेली मंदी या कारणांमुळे सोन्याचे भाव वधारले आहेत.