बहुजननामा ऑनलाईन टीम – लॉकडाउन कालावधीमध्ये देशभरातील सराफा बाजार बंद असले तरी सोन्याच्या किंमतीतील चढउतार कायम आहे. या काळात सोन्याच्या किंमतींनी काही रेकॉर्ड देखील रचले आहेत. महिन्याच्या 15 मे रोजी सोन्याच्या किंमतींनी 47,067 रुपये प्रति तोळावर पोहचून एक रेकॉर्ड रचला होता. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये सोन्याच्या किंमती उतरल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव प्रति तोळा 46 हजार 929 रुपयांवर येऊन पोहोचले होते. पूर्ण दिवसभरात सोन्याच्या किंमती 66 रुपयांनी कमी झाल्या होत्या.
डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यामुळेआणि हाँगकाँगवरून चीन-अमेरिकेत सुरू असलेल्या तणावामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये हा बदलाव पाहायला मिळाला आहे. 25 मार्च ते 14 एप्रिल या 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान एकूण 2 हजार 610 रुपये प्रति तोळाने सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या. तर 15 एप्रिल ते 3 मे दरम्यान असणार्या लॉकडाऊनच्या दुसर्या टप्प्यामध्ये सोने एकूण 121 रुपये प्रति तोळाने वधारले होते. 3 मे ते 17 मे दरम्यान लॉकडाऊनचा तिसरा टप्पा होता. या कालावधीमध्ये सोन्याचे दर 1 हजार 154 रुपये प्रति तोळाने वाढले होते. याच काळात सोन्याने 47 हजार 000 चा टप्पा पार करत नवे रेकॉर्ड रचले होते.