नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Update | आजपासून नवीन व्यवहाराच्या आठवड्याची सुरुवात होत आहे. मागील व्यवहाराच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली. अशावेळी आज सर्वांची नजर या गोष्टीवर असेल की, सोने आणि चांदीची सराफा बाजारात कशी वाटचाल असेल. मागील व्यवहाराच्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरणीचे सत्र सुरू राहीले. परिणामी सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 10000 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे, तर चांदी 19000 रुपयांपर्यंत स्वस्त (Gold Price Update) झाली आहे.
इंडियन बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) सुट्टीमुळे शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचा रेट जारी करत नाही. जाणकारांनुसार आगामी दिवसात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते.
शुक्रवारी सोने-चांदीचा होता हा भाव
या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (24 September) सुद्धा सोन्याच्या किमतीत घसरण नोंदली गेली. शुक्रवारी सोन 420 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने स्वस्त होऊन 46274 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. तर गुरुवारी सोने 46694 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले होते. (Gold Price Update)
शुक्रवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा घसरण नोंदली गेली. शुक्रवारी चांदी 378 रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 60410 रुपयांच्या स्तरावर बंद झाली. यापूर्वी गुरुवारी चांदी 60788 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोने 9926 रुपयांनी तर चांदी 19570 रुपयांनी स्वस्त
अशाप्रकारे सोने आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 9926 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे. सोन्याने ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आपला सर्वोच्च स्तर गाठला होता.
तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरापासून सुमारे 19570 रुपये प्रति किलो दराने स्वस्त मिळत आहे. चांदीचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे.
अंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचा दर
अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात तेजीसह व्यवहार होत आहे. आज अमेरिकेत सोन्याचा व्यवहार 6.54 डॉलरच्या तेजीसह 1752.35 डॉलर प्रति औंसच्या दराने होत आहे. तर चांदीचा व्यवहार 0.02 डॉलरच्या तेजीसह 22.59 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर होत आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा नवीन दर
भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी 24 कॅरेट सोने 46274 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोने 46307 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 42370 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 34692 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 27060 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.
web title: Gold price update gold silver jewelry price rate update 27th september know latest rate indian sarafa market.
Pune Crime | ‘वास्तूशोध’च्या बिल्डर कुलकर्णी बंधूंवर फसवणूक प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल