नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Gold Price Update | तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर चांगली बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या व्यवहाराच्या चौथ्या आठवड्याच्या तिसर्या दिवशी बुधवारी (25 August) सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदली गेली. एमसीएक्स (MCX) वर बुधवारी सोने 272 रुपये स्वस्त झाले. या घसरणीसह सोने 47340 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आले आहे. यापूर्वी मंगळवारी सोने 47710 रुपये प्रति तोळा दरावर बंद झाले. तर सोमवारी सोने 47411 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद (Gold Price Update) झाले होते.
चांदी 423 रुपयांनी स्वस्त
बुधवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण नोंदली गेली. बुधवारी चांदी 423 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने स्वस्त झाली. या घसरणीनंतर चांदी 63073 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर आली. यापूर्वी मंगलवारी चांदी 63450 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती. तर सोमवारी चांदी 63608 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
14 ते 24 कॅरेट सोन्याचे नवीन दर
या बुधवारी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 47710 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेटचे सोने 47365 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचे सोना 43560 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेटचे सोने 35666 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेटचे सोने 27820 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर ट्रेड करत आहे.
ऑलटाइम हायपासून सोने 9000 आणि चांदी 17000 रुपये स्वस्त
अशाप्रकारे सोने आणि चांदी अजूनही ऑल टाइम हायपासून खूप स्वस्त विकले जात आहे. सोने आपल्या ऑलटाइम हायपासून सुमारे 9000 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये स्वस्त विकले जात आहे.
सोने आपल्या ऑलटाइम हायवर ऑगस्ट 2020मध्ये होते. त्यावेळी सोने 56,200 रुपये प्रति दहा गॅ्रमच्या स्तराव गेले होते. तर चांदीचा आतापर्यंतचा उच्चतम स्तर 79980 रुपये प्रति किलो आहे. या हिशोबाने चांदी सुद्धा आपल्या उच्चतम स्तरापासून सुमारे 17000 रुपये स्वस्त विकले जात आहे.
web title : Gold price update gold silver jewelry price rate update 26th august know latest rate indian sarafa market today.
BJP vs Sena | ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्रार
Aadhaar Card मध्ये जन्म तारीख अपडेट करणे झाले आता आणखी सोपे, केवळ फॉलो करा ‘ही’ प्रोसेस
Gold-Silver Price Today | सलग तीन दिवस सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर