नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Gold Price Update | आजपासून ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या व्यवहाराच्या आठवड्याला सुरूवात होत आहे. या दरम्यान सोने खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. अजूनही सोने आपल्या सर्वोच्च किंमतीपासून सुमारे 9000 रुपये प्रति तोळा स्वस्त मिळत आहे. तर चांदी 17000 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने स्वस्त विकली जात आहे. अशावेळी जर तुम्ही सोने खरेदी (Gold Price Update) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ही चांगली संधी आहे.
किंमतीत चढ-उतार जारी राहील
अशावेळी सर्वांची नजर आज या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सराफा बाजारावर असेल. मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत तेजी नोंदली गेली. जाणकारांनुसार, या आठवड्यात सुद्धा सोन्याच्या किमतीत चढ-उतार जारी राहील. तसेच आगामी काळात सुद्धा सोन्यातील गुंतवणूक नफा देऊ शकते.
हे आहेत सोने-चांदीचे मागील बंद दर
मागील व्यवहाराच्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ 53 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी दिसून आली. या तेजीसह सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर बंद झाले. तर चांदी 1108 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने स्वस्त 62233 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देशातील प्रमुख शहरात सोन्याचा दर
जर प्रमुख शराहत सोन्याच्या किंमतीवर नजर टाकली तर शुक्रवारी दिल्लीत 24 कॅरेट सोने 50440
रुपये आणि 22 कॅरेटचे सोने 46240 रुपये होते. मुंबईत 24 कॅरेट सोने 47120 आणि 22 कॅरेट
सोने 46120 रुपये प्रति तोळा दराने विकले जात होते.
तर कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 49 हजार 290 रुपये आणि 22 कॅरेट सोने 46590
रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तिकडे चेन्नईत 24 कॅरेट सोने 48710 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची
किंमत 44650 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या हिशोबाने विकले जात होते.
आठवड्यातील सोने-चांदीची अशी होती वाटचाल
सोमवारी (16 ऑगस्ट) 24 कॅरेटचे सोने 46993 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 62887 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. मंगळवारी (17 ऑगस्ट) सोने 47583 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 63977 रुपये प्रति किलोग्रॅमच्यावर बंद झाली होती. बुधवारी (18 ऑगस्ट) सोने 47583 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 63936 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होते. गुरुवारी (19 ऑगस्ट) सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 63341 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. तर या व्यवहाराच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने 47276 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62471 रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर बंद झाली.
web title: Gold price update gold silver jewelry price rate update 23rd august know latest rate indian sarafa market today.
Weight Loss Tips | वेगाने वजन कमी करण्यासाठी रोज इतके मिनिटे करा ‘ही’ एक्सरसाईज, जाणून घ्या
Health Care Tips | चहा पिताना कधीही करू नका 4 चूका, अन्यथा ‘या’ आजारांना पडू शकता बळी; जाणून घ्या