मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मागील चार दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये घसरण पहायला मिळत आहे. शुक्रवारी (दि.21) पुन्हा सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. मागील चार दिवसांत तिसऱ्यांदा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय किंमतीतील घसरणीमुळे आज देशांतर्गत बाजारातील सोन्याचे भाव घसरले आहेत. आज MCX वर जून वायदा सोन्याची किंमत 0.40 टक्क्यांनी घसरली. त्याच वेळी जुलै वायदा चांदीच्या किंमतीत 0.80 टक्क्यांनी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इक्विटी मार्केटमधील वाढीदरम्यान सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. मात्र, डॉलरच्या घसरणीमुळे ही घट मर्यादित रहिल असे तज्ज्ञांचे मत आहे.
सोन्याचे नवे दर
शुक्रवारी (दि.21) एमसीएक्सवरील (MCX) जून वायदा सोन्याची किंमत 186 रुपयांनी घसरून 48 हजार 358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
चांदीचे नवे दर
सोन्याचे दर घसरले असताना दुसरीकडे एमसीएक्स वरील जुलै वायदा चांदीचा दर 525 रुपयांनी घसरला. त्यामुळे जुलै वयदा चांदीचा दर 71 हजार 779 रुपये प्रतिकिलोवर आला आहे.
महागाईमुळे सोन्याच्या दरात घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई वाढल्याने सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण पहायला मिळत आहे. स्पॉट सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी घटून ते 1,872.21 डॉलर प्रति औंस झाले. मात्र, या आठवड्यात सोन्याच्या दरात दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय चांदी 0.1 टक्क्यांनी घसरुन 27.72 डॉलर प्रति औंस झाली आहे.
स्वस्त सोने खरेदीची आजची शेवटची संधी
सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करण्याची आजची शेवटची संधी आहे. ही योजना 17 मे पासून गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली होती. बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन किंवा डिजिटल पैसे भरणाऱ्यांना बाँडच्या एकूण किंमतीमध्ये प्रति ग्रॅम 50 रुपये सुट देण्यात येत आहे. हे बाँड्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑप इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडकडून खरेदी करता येतात.