नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) वाढ झाली आहे. 21 डिसेंबर 2020 रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 496 रुपयांनी वाढला आहे. सोन्याचा दर आता 50000 रपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. एवढंच नाही तर चांदीच्या किंमतीतही (Silver Rate) वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 2000 रुपयांपेक्षा जास्त वाढला आहे.
जाणकार सांगतात की, आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोना व्हायरसबद्दल चिंतेचं वातावरण निर्माण झाल्यानं सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 49,801 रुपये प्रति 10 ग्रॅम होते तर चांदी 67,228 रुपये प्रतिकिलो होती.
सोन्याचे नवे दर (Gold Rate on 21 December 2020)
सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 496 रुपये प्रति 10 ग्रॅमनं वाढले. यानंतर आता दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे नवे दर 50,297 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा झाला आहे. इतकंच नाही तर रुपया देखील डॉलरच्या तुलनेत घसरला असून 7.73 वर पोहचला आहे.
चांदीचे नवे दर (Silver Rate on 21 December 2020)
चांदीच्या दरातही सोमवारी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. आज दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात 2249 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळं चांदीचे दर हे 69,477 रुपये प्रति किलो झाले आहेत.
एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर ॲनलिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या-चांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा परिणाम भारतीय बाजारावर पडला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळं कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. सुरक्षित गुंतवणूकीची गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे. म्हणून आज गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं आहे.