नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या दरात आज वाढ (Gold Price Today) नोंदली गेली आहे. बुधवारी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold price Today) 47,040 रुपयांवरून वाढून 47,300 रुपये आणि चांदीची किंमत (Silver) 67,500 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. उत्पादन शुल्क, राज्यांचे कर आणि बदलामुळे सोन्याच्या दागिन्यांची किंमत संपूर्ण भारतात वेगवेगळी असते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,400 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत आहे. चेन्नईत ती 45,660 रुपये आहे. वेबसाइटनुसार मुंबईत रेट 47,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत बुधवारी 260 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून 48,300 रुपये झाली, जी मागील व्यवहाराच्या सत्रात 48,040 रुपये होती. चांदी मागील व्यवहाराच्या सत्रात 67,800 रुपयावरून 300 रुपये प्रति किलोग्रॅमने घसरून 67,500 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.
सोन्याच्या किंमतीत का आली तेजी
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, डॉलरच्या तुलनेत रुपयात मजबूती आल्याने गोल्डच्या किंमीतमध्ये तेजी आली आहे.
दरम्यान, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,
वर्षाच्या अखेरपर्यंत सोने मागील रेकॉर्ड तोडत 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचू शकते.
अशावेळी गुंतवणुकदारांनी 6 महिन्याचा कालावधी आणि स्टॉपलॉस लावून सोने खरेदी केले तर नफा कमावू शकतात.
Web Title :- Gold Price Today | gold price today on 21 july 2021 gold cross 47k rupees check latest rate
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला