नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) घसरण होत आहे. आजही सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही आज सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज जवळपास 9000 रुपयांनी स्वस्त सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Rates) 47 हजार 340 रुपये प्रति तोळा आहे. याशिवाय चांदीच्या दरात देखील घसरण (Silver Price Today) झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रमुख शहरातील सोन्याचे दर (Gold Price Today)
दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर (22 carat gold Rates) 47,410 रुपये प्रति तोळा आहे. मुंबई 47,340, चेन्नई 45,420 आणि कोलकातामध्ये 47,660 रुपये प्रति तोळा भाव आहे. याशिवाय 24 कॅरटचा दिल्लीमधील दर 51,710 रुपये, मुंबई 48,340, चेन्नई 49,550 आणि कोलकाता 49,760 रुपये प्रति तोळा भाव आहे.
चांदीचे आजचे दर (Silver Price Today)
मुंबई – 68,400 रुपये प्रति किलोग्रॅम
दिल्ली – 68,400 रुपये प्रति किलोग्रॅम
कोलकाता – 68,400 रुपये प्रति किलोग्रॅम
चेन्नई – 73,200 रुपये प्रति किलोग्रॅम
आज सोनं 8860 रुपयांनी स्वस्त
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे भाव 56 हजार 200 रुपये प्रति तोळा या उच्चांकी स्तरावर पोहचले होते. हा दर आतापर्यंतच्या सर्वोच्च आहे. तर आज गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर 47,340 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात आज सोन्याचे दर प्रति तोळा 8860 रुपयांनी स्वस्त आहेत.
Web Titel :- gold price today gold price today on 17th july gold rates fall down at 47340 rs per 10 gram check here
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’
Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये