नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 22 डिसेंबर 2021 ला सोन्याच्या दरात (Gold Price Today 22 December 2021) घसरण दिसून आली. मात्र, यानंतर सुद्धा सोन्याचा दर 47 हजार रुपयांच्या वर कायम राहिला. तर, चांदीच्या किमतीत (Silver price Today 22 December 2021) आज उसळी नोंदली गेली.
दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात अवघी 145 रुपयांची घट नोंदली गेली. तर, चांदीच्या किमतीत आज 397 रुपयांची घसरण झाली.
मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 47,238 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 60,895 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. (Gold Price Today)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोन्याचा आजचा दर
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 145 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या किरकोळ घसरणीसह 47,093 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा आज सोन्याच्या किमतीत घट झाली आणि ते 1,787 डॉलर प्रति औंसवर पोहचले.
चांदीचा आजचा दर
चांदीच्या दरात आज घट नोंदली गेली आणि ती 60 हजार रुपये प्रति किग्रॅवर कायम राहिली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचा दर 397 रुपयांच्या घसरणीनंतर 60,498 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
Web Title :- Gold Price Today | gold price today 22 december 2021 gold silver rate dipped tapasa taja sonya chandi cha dar.
Pune Crime | पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षा ! मास्क कॉपी प्रकरणात परीक्षार्थीसह पोलिसाला अटक
Pune Crime | 24 वर्षीय तरूणीची 4 मजली इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या, पुण्याच्या वाकड परिसरातील घटना