Gold Price Today : लग्नसराईत सोने झाले ‘स्वस्त’, जाणून घ्या दर

नवी दिल्लीः – सोने(Gold ) आणि चांदीच्या भावात सातत्याने चढउतार दिसून येत आहे. आता पु्न्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. जर आपण या लग्नसराईमध्ये सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही खास वेळ आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या(Gold ) किंमतीत 8000 हजार रुपयांपर्यंतची घट झाली आहे. तसेच चांदीच्या किमंतीतही घट दिसून आली आहे.
सराफ बाजारमध्ये पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट दिसून येत आहे. गुरुवारी सोन्याच्या किंमतीत ल ( Gold Price) 534 रुपयांची घट झाली. यानंतर आता सोने 48 हजार 652 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. याआधी बुधवारी सोने 49 हजार 186 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तसेच चांदीच्या किंमतीतही घट झाली आहे. चांदी जवळपास 628 रुपयांनी घसरून सध्या 62 हजार 711 रुपये प्रतिकिलो झाली आहे. बुधवारी चांदी 63 हजार 339 रुपये प्रति किलो होती.
कोरोना लसीच्या आगमनाची बातमी आल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. जाणकरांच्या मतानुसार, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा आणि अमेरिका चीनमधील तणाव कमी झाल्याने गुंतवणूकदार सोने सोडून शेअर बाजाराकडे वळले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस तरी सोन्याच्या किंमतीत फार मोठी वाढ होणार नाही. अजुनही मोठ्या कालावधीसाठी सोने गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूचे भाव पडल्याने देशात सोने आणि चांदीच्या भावात घट झाली आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी सोने आणि चांदी दोन्हीच्या किंमतीत आजवरची सर्वात जास्त किंमत गाठली होती. त्या दिवशी सोने 56 हजार 200 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर चांदी 77 हजार 840 रुपये प्रति किलो होती.
Comments are closed.