नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 28 जुलै 2021 ला सोन्याच्या भावात (Gold Price Today) घसरणीचा कल राहिला. तर, चांदीच्या किंमतीत आज 1000 रुपयांपेक्षा जास्त घट नोंदली गेली. यानंतर चांदी 65 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली गेली. मागील व्यवहराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,668 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद (Gold Price Today) झाले होते. तर, चांदी 65,873 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. अंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन-चांदीत तेजी नोंदली गेली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सोन्याची नवीन किंमत
दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या भावात केवळ 61 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली.
राजधानी दिल्ली (Delhi) मध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवीन भाव आज 46,607 रुपये प्रति
10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज किरकोळ प्रकारे
वाढून 1,800 डॉलर प्रति औंसवर पोहचली. फॉरेक्समध्ये आज रुपया डॉलरच्या तुलनेत 4 पैशाच्या
मजबूतीसह 74.43 च्या स्तरावर व्यवहार करत होता.
चांदीचा नवीन भाव
चांदीच्या किंमतीत आज ताबडतोब घसरण दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी चांदीचा दर 1,094 रुपयांच्या घटसह 64,779 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात उसळी नोंदली गेली आणि तो 24.76 डॉलर प्रति औंसवर पोहचली.
सोन्याच्या किंमतीत का झाली घट
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, रुपयात मजबूती आणि कमोडिटी एक्सचेंजमध्ये किंमत घटल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात घट घाली.
Web Title : gold price today fell to 46607 per 10 gram and silver dipped by rupees 1094 dollar ruppe on 28 july 2021
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’