नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदीच्या Gold price किंमतीत आज घसरण दिसून येत आहे. कमजोर ग्लोबल मार्केटच्या दरम्यान भारतीय बाजारात सुद्धा सोन्याचे दर Gold price घसरले आहेत. एमसीएक्सवर सोने वायदा 0.08 टक्केच्या घसरणीसह 48,953 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर चांदी वायदा 0.3 टक्केच्या घसरणीसह 71,308 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.
सोने जरी महाग असले तरी ते आपल्या सर्वकालीन उच्च स्तरापेक्षा खुप स्वस्त विकले जात आहे.
सोने Gold सध्या आपल्या विक्रमी उच्च स्तरापेक्षा 7000 रुपये स्वस्त आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56 हजार रुपयांच्या पुढे गेली होती.
इंटरनॅशनल मार्केटमध्ये गोल्डची स्थिती
अंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोन्याचा दर कमी झाला आहे.
हाजिर सोने 0.2 टक्के घसरणीसह 1,886.76 डॉलर प्रति औंसवर होते.
मात्र, अमेरिकन बाँड यील्डने किमती धातुमध्ये नुकसान मर्यादित केले आहे.
अन्य किमती धातुंमध्ये चांदी 0.7 टक्के घसररून 27.58 डॉलर प्रति औंस झाली आहे, तर प्लॅटिनम 0.2 टक्के वाढून 1,164.72 डॉलर झाले.
24 कॅरेट सोन्याचा भाव
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, देशाच्या राजधानीसह सर्व महानगरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे वेगवेगळे भाव आहेत.
दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर 51270 रुपये आहे.
याशिवाय चेन्नईत 50370 रुपये, मुंबईत 49320 रुपये आणि कोलकातामध्ये 50720 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कृपया हे देखील वाचा:
काँग्रेस-राष्ट्रवादी मधील तणाव निवळला? बाळासाहेब थोरात पोहोचले शरद पवारांच्या घरी (व्हिडीओ)
दुर्दैवी ! मासेमारीसाठी गेलेल्या तिघा भावंडांचा तलावात बुडून मृत्यू, सांगली जिल्ह्यात खळबळ
‘या’ कारणामुळं तब्बल 27 वर्षांनंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घेतला घटस्फोट, जाणून घ्या
अहमदनगर ! काय सांगता ! होय, पोलिस कर्मचार्यानं सहकारी महिलेला मिठीत घेण्याचा केला प्रयत्न, अन्…