नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज म्हणजे 10 ऑगस्ट 2021 ला सोन्यात (Gold Price Today) पुन्हा घसरणीचा कल होता. यामुळे सोने आज 45 हजार रुपयांवर पोहचले. तर, चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा आज पुन्हा मोठी घसरण नोंदली गेली. यामुळे चांदी 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली पोहचली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात (Delhi Bullion Market) सोने 45,286 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर चांदी 62,663 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. भारतीय सराफा बाजाराच्या (Indian bullion market) उलट अंतरराष्ट्रीय बाजारात (International market) आज सोन्याचे दर वाढले, तर चांदीत विशेष बदल झाला नाही.
सोन्याचे नवीन दर
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या भावात 176 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट नोंदली गेली. यामुळे सोने 45 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 45,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. याउलट अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत आज वाढून 1,735 डॉलर प्रति औंसवर पोहचली.
चांदीचा नवीन दर
चांदीच्या किमतीत आज पुन्हा जबरदस्त घसरण दिसून आली.
यामुळे चांदी 62 हजार रुपये प्रति किग्रॅच्या खाली पोहचली.
दिल्ली सराफा बाजारात (Delhi Bullion Market) मंगळवारी चांदीचा दर 898 रुपयांनी कमी होऊन 61,765 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 23.56 डॉलर प्रति औंसवर पोहचली.
सोने-चांदीत का झाली घसरण
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की,
रुपयाच्या तुलनेत डॉलरमध्ये आलेल्या जबरदस्त तेजीमुळे सोन्याच्या किंमती सतत कमी होत आहेत.
Web Title : gold price today declines to 5 month low and silver prices also fell drastically view details
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Indo-Tibetan Border Police | कडक सॅल्यूट ! उच्चाधिकारी बनलेल्या मुलीला पाहून PI वडिलांनं केला ‘सलाम’