नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात तेजीचे सत्र जारी आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोने (Gold Price Today) 242 रुपयांनी महाग झाले. राष्ट्रीय राजधानीत सोने सोमवारी 242 रुपयांच्या तेजीसह 47,242 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यवहाराच्या सत्रात सोने 47 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.
चांदीच्या किंमतीत 543 रुपयांची तेजी
तर, सोन्याच्या दरात वाढ होण्यासह चांदीच्या किमतीत सुद्धा (Silver Price Today) सोमवारी 543 रुपयांची तेजी आली.
यानंतर दिल्लीत चांदी 62,248 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली. चांदी मागील व्यवहाराच्या सत्रात 61,705 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.
हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते.
विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते.
यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा.
web title : gold price today check gold silver latest price in india 29 november 2021 check today 10 gram gold price 22 carat gold price 24 carat gold rate in your city.
Devendra Fadnavis | अमृता फडणवीस राजकारणात येणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
TV खरेदीसाठी जाताय का? ‘या’ 5 गोष्टी आवश्य पाहून घ्या, अन्यथा नंतर वाढू शकते चिंता!