बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीचे भाव हे सारखे चढ उतार होताना दिसत होते. तर आता शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वायदे किंमतीत घसरण झाली आहे. यामुळेच सोन्याचे भाव सर्वोच्च स्तरावरून ९००० रुपयांनी कमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. १२) रोजी फक्त सोन्याचे भाव स्थीर झाले आहेत. त्यामुळे सोने स्वस्त झाल्याचे पाहायला मिळते. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) एप्रिलसाठी सोन्याची वायदे किंमत ०.०७ टक्क्यांनी कमी झाली आहे, परिणामी हे दर ४७.४७५ रुपये प्रति तोळावर पोहोचले आहे. चांदीची मार्चमधील वायदे किंमत ०.१६ टक्क्यांनी वाढली आहे.
अनके तज्ञांच्या माहितीनुसार, अमेरिकन इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि बिटकॉइनच्या दरात तेजी आल्यामुळे सोन्याचांदीमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे. तसेच सोन्याचे दर काही काळासाठी ४७.२०० या स्तरावर ट्रेड करतील. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर एका टक्क्याने तर चांदीचे दर ०.३३ टक्क्यांनी कमी झाले होते. दरम्यान ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर ५६.२०० च्या स्तरावर पोहोचले होते, त्यामुळे यावरून सोन्याचे दर कमी झाले आहेत.
दरम्यान, अमेरिकन इक्विटी मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि बिटकॉइनच्या दरात तेजी आल्यामुळे सोन्याचांदीमध्ये कमजोरी पाहायला मिळते आहे. परंतु, दुसरीकडे डॉलर इंडेक्समध्ये कमजोरी, अमेरिकन प्रोत्साहन पॅकेज इत्यादी बाबींमुळे सोन्याच्या किंंमतीला सपोर्ट मिळत आहे. दरम्यान काही तज्ज्ञांचं असं मत आहे की चीनमध्ये लुनार न्यू इयर असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव वधारण्याची शक्यता आहे. भारत सरकारकडून सोन्यावरील आयात शुल्क कमी केल्याने मागणी वाढली आहे, परिणामी सोन्याच्या किंमतीला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे असे तज्ञांच्या माहितीनुसार समजते.