नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाच महिन्यांतील सर्वात खराब आठवड्यानंतर सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. चीन आणि अमेरिकेत व्यापारी संबंधात संभाव्य सुधारा होण्याची चिन्हे अद्याही दिसून येत नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरत आहेत. स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी घसरून 1934.91 डॉलर प्रति औंस झाले आहे. गेल्या आठवड्यात सोन्यामध्ये 4.5 टक्के घसरण झाली होती. ती मार्चनंतरची सर्वात मोठी घसरण होती.
जागतिक वायदे बाजारात किंमती वाढ दिसून आली आहे. यूएस गोल्ड फ्यूचरमध्ये 0.3 टक्क्यांनी वाढ होऊन किंमत 1943.50 डॉलर प्रति डॉलर झाली आहे. एमसीएक्स एक्सचेंजला रात्री नऊ वाजता सोन्याची किंमत वायदा बाजारात 97 रुपयांची घसरण होऊन 52 हजार 130 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. एमसीएक्सवर 4 सप्टेंबर 2020 रोजी चांदीचे दर सकाळी नऊ वाजता 111 रुपयeनी घसरून 67 हजार 060 रुपये प्रतिकिलो होता.
देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरले
अमेरिकेत सरकारी बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याने सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. तसेच सोन्याच्या किंमती जोरात वाढताना गुंतवणूकदारांकडून नफा बुकिंगही करण्यात आले. यामुळेही आठवड्यात सोन्याच्या किंमती घसरण पहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती कमी झाल्या. शुक्रवारी सोन्याचा दर 1.5 टक्क्यांनी घसरून 52 हजार 170 रुपये होता. आठवड्यात सोन्याच्या किंमतीमध्ये प्रति दहा ग्रॅम 2600 रुपयांनी घट झाली.