बहुजननामा ऑनलाईन टीम : धनत्रयोदशीच्या शुभमूर्तावर आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दर कमी झाल्याने सोने आता खरेदीवर भर देता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत सोन्याच्या दरात ३० रुपयांची किरकोळ घसरण आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने ही घसरण झाल्याचे समजते.
दिवाळीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या खरेदीवर नागरिकांची पसंती असते. तसेच धनत्रयोदशीच्याआणि दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. सोन्याच्या दरात ३० रुपयांनी घसरण झाल्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमवर ३८,९५५ रुपये पोहोचला आहे. यापूर्वी शनिवारी सोन्याचा दर ३८,९८५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. दरम्यान अमेरिका-चीन या दोन्ही देशांत सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणीची कमतरता, तसेच मध्यंतरी भाव वाढ झाल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांनीही सोने खरेदीवर लक्ष न दिल्याने हि घसरण झाल्याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीचे तपन पटेल यांनी दिली. सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी, दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. सोमवारी चांदीच्या दरात १५० रुपयांनी वाढ होऊन चांदीचा दर प्रति किलो ग्रॅमवर ४६,७५० रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी चांदीचा दर ४६,६०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.
Visit : bahujannama.com