नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने – चांदीच्या दरात भारतीय बाजारात बुधवारी (दि.2) घसरण झाल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसात सोन्याच्या Gold किमतीत वाढ झाली होती. पण आज किंचतशी घट नोंदविण्यात आली आहे. सोन्याच्या दरात आज 116 रुपयांची तर चांदीच्या दरात 1291 रुपयांची अशाप्रकारे दोन्ही धातूंची मिळून 1300 रुपयांची घट झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याचा Gold दर 48 हजार 772 इतका आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो 70 हजार 836 इतका नोंदवला आहे. मंगळवारी हाच दर सोन्यासाठी 48 हजार 888 रुपये इतका होता. तर चांदीसाठी प्रतिकिलो 72 हजार 123 रुपये इतका होता.
आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहयला मिळाले. इन्वेस्टिंग डॉट कॉमच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी सोन 6.20 डॉलरच्या तुटीसह 1.898.80 डॉलर प्रतिऔंसवर ट्रेंड करत होता. तर याचवेळी चांदीचा दर 0.215 डॉलरच्या तुटीसह 27.887 डॉलर प्रतिऔंसवर ट्रेंड करत होता. दुसरीकडे MCX वरही सोन्याच्या भावात किंचित घट झाली आहे. MCX वर दुपारी 3 वाजता सोन्याच्या दरात घट होऊन 49 हजार 424 रुपयांवर ट्रेंड करत होता.
तर ऑक्टोबरसाठीच्या दरात 121 रुपयांची तेजी पाहायला मिळत होती. MCX वर चांदीच्या दरातही घट झाल्याचे दिसून आले. चांदीसाठी जुलैच्या दरात 293 रुपयांच्या घसरणीसह प्रतिकिलो 71 हजार 955 रुपयांवर ट्रेंड करत होता. त्याचपद्धतीनं सप्टेंबरसाठीच्या चांदीच्या दरात 505 रुपयांची घट दाखवत प्रतिकिलो 72 हजार 908 रुपये ट्रेंड सुरु होता.
या सोप्या घरगुती उपायांव्दारे दूर करा हिरड्यांतून येणारा रक्तस्त्राव; जाणून घ्या
‘दरवाजा बंद होता म्हणून पंतप्रधानांच्या बैठकीला येता आले नाही’
‘त्या 12 आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन ! नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?’
गरवारे शाळेत तरुणाचा खुन; आरोपींने स्वत येऊन सांगितला पोलिसांना घटनाक्रम
पाठीच्या मणक्याच्या वेदना आणि प्रतिबंधात्मक उपाय; जाणून घ्या