नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोनभद्रच्या डोंगरावर शेकडो टन सोने सापडले आहे. या भागातून सोन नदीत येते, ज्यामुळे या नदीत सोने नसल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. की या नदीमधून सोनं तर भेटत नाही ना ?, परंतु देशामध्ये अशीही एक नदी आहे जी सोने बाहेर काढते. या नदीचे नाव स्वर्णरेखा नदी आहे जी झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात वाहते. झारखंडमध्ये रत्नगर्भा नावाची जागा आहे. येथूनच स्वर्णरेखा नावाची नदी वाहते. या नदीच्या वाळूमधून वर्षानुवर्षे सोनं काढलं जात आहे. झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात ही नदी वाहते. बंगालमध्ये त्याला सुवर्णरेखा असेही म्हणतात.
स्वर्णरेखा नदी रांचीपासून १६ कि.मी. दक्षिण – पश्चिमेकडील नगडी गावात राणी चुआन नावाच्या ठिकाणाहून उगम पावते. झारखंडमधून वाहत ती ओडिशा, पश्चिम बंगाल मार्गे बंगालच्या उपसागरात बालेश्वरच्या नावाच्या ठिकाणी जाते. या नदीची लांबी ४७४ किमी आहे. स्वर्ण रेखा आणि तिची उपनदी करकरीच्या वाळूत सोन्याचे कण आढळतात. काही लोक म्हणतात की स्वर्ण नदीतील सोन्याचे कण करकरी नदीमधून वाहतात. करकरी नदीची लांबी फक्त ३७ किमी आहे. ती एक छोटी नदी आहे. आजपर्यंत हे रहस्य उलगडले गेले नाही कि, या दोन नद्यांमधून सोन्याचे कण नक्की कोठून येतात ?
झारखंडमध्ये, तामार आणि सारंडा सारख्या ठिकाणी, आदिवासी नदीच्या पाण्यात वाळू फिल्टर करण्यासाठी आणि सोन्याचे कण गोळा करण्यासाठी काम करतात. एका महिन्यात एखादी व्यक्ती ६०-८० सोन्याचे कण काढू शकते. कणांचा आकार तांदळाच्या दाण्यापेक्षा मोठा किंवा किंचित मोठा आहे. इथले आदिवासी पावसाळ्याशिवाय इतर वर्षभर हे काम करतात. दोन दिवसांपूर्वी सोनभद्रच्या डोंगरावर सोन्याचा एक मोठा साठा सापडला होता. २०१२ मध्ये सोनभद्रच्या डोंगरावर सोन्याचे अस्तित्व असल्याची पुष्टी केली गेली होती पण अद्याप या दिशेने काम सुरू झालेले नाही. परंतु आता राज्य सरकारने सोन्याचे ब्लॉक्स वाटप करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. सोनभद्रच्या हरदी भागात ६४६.१५ किलो सोन्याचे साठे सापडले आहेत, तर सोन हिलमध्ये २९४३.२५ टन सोने सापडले आहे.