बहुजननामा ऑनलाईन – दिवसेंदिवस सोन्याचे भाव हे वाढत चाले आहे. तर मागील एका वर्षात भारतात सोन्याच्या दरात वाढ ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. यामागील कारण म्हणजे मुदत ठेवीवर मिळणारे रिटर्न हे कमी होत चाले आहेत. मात्र आता सोन्याशी निगडित असलेल्या गोल्ड ईटीएफ स्कीममध्ये पैसे गुंतविल्यास तुम्हाला ३८ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. सोन्याच्या वाढत्या किमतीत होणारी वाढ सध्या थांबेल असे वाटलं नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच तुम्हाला गोल्ड इटीएफमध्ये पैसे गुंतविल्यास चांगलाच नफा मिळू शकतो.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सचेंज ट्रेड फंड (इटीएफ) ही योजना म्युच्युअल फंडचीच एक योजना आहे. युनिट स्टॉक एक्सचेंजमध्ये या योजनेची नोंदणी ही केली जाते. सात टक्के व्याजदराने इतर देशातील बँकांमध्ये परतावा मिळत आहे. पण तुम्ही एक वर्षासाठी आरबीएल बँकेत ७. ९ टक्के व्याजदराने दहा हजार रुपये गुंतविल्यास १०, ८१४ रुपयांचा नफा तुम्हाला मिळू शकतो. तर लक्ष्मी विलास बँकेत ७. ७५ टक्के व्याजदराने गुंतविल्यास १०, ७९८ रुपयांचा नफा मिळू शकतो.
कोटक वर्ल्ड गोल्ड फंडने एका महिन्यात ३२ टक्के व्याजदराने परतावा दिला आहे. तर डीएसपी वर्ल्ड गोल्ड फंडने एका वर्षांत ३८ टक्के व्याजदराने परतावा दिला आहे. हा ट्रेंड सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सुरु असून जूनमध्ये सोन्याच्या किमती १३०० डॉलर प्रति तोळा दराने होता. ऑगस्टमध्ये त्यात १५०० रुपये परतावी तोळा दराने वाढ झाली आहे. तर देशांतर्गत बाजारात जूनमध्ये सोन्याची किंमत ३३००० हजार रुपये प्रति तोळा होता. तर ऑगस्टमध्ये त्यात वाढ होऊन ३८००० रुपये प्रति तोळा इतका झाला. सोन्याचं दरात ऑगस्टमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर तज्ञांनी भविष्यात सोन्याचे दर ४१ हजार रुपयांपर्यत पोहचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
केडिया कमोडीचे अजय केडिया यांनी याबाबत माहिती दिली की, फक्त चांगल्या परताव्यासाठी सोन्यात गुंतवणूक करू नये. तुम्ही खरेदी केलेले युनिट डिमॅट खात्यात जमा केले जातील. शिवाय गोल्ड एटीएफ कार्यक्षम ही असतात. त्यामुळेच प्रत्यक्ष सोने ठेवण्याची गरजच नसते. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही बाजारभावाने याची विक्री करू शकता. गोल्ड ईटीएफ योजना ही सोन्यात गुंतवणूक करण्याचे सुरक्षित साधन आहे. तुमच्या गरजेच्या वेळी ईटीएफच्या बाजारभावाच्या किमतीत तुम्हाला रोखही मिळते.
समभाग ब्रोकरकडे हे पैसे मिळविण्यासाठी तुम्हाला ट्रेंडिग आणि डिमॅट खाते सुरु करावे लागेल. लमसम किंवा सिस्टमॅटिक इनव्हेंटमेंट प्लॅनने काही कालावधीच्या अंतराने तुम्ही खरेदी करू शकता किंवा याही व्यतिरिक्त तुम्ही एक ग्रॅम सोने देखील करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या शेअर ब्रोकरकडे तुमचे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडा. पासवर्ड आणि लॉगिनआयडी ला ब्रोकरच्या ऑनलाईन पोर्टलवर लॉगिन करून तुम्हाला हवी असलेली वस्तू खरेदी करू शकता. हव्या असलेल्या युनिटसाठी तुमची खरेदीची ऑर्डर द्या. त्यानंतर तुमच्या खात्यातून पैसे वजा होऊन दुसऱ्या दिवशी डिमॅट खात्यात जमा केले जातील.