मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मागिल काही दिवसांपासून सोन्याचे दर तेजीनं वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात सोन्याला झळाळी आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात तेजी आली. आज 800 रुपयांनी सोने महाग झालं असून 51 हजार 833 रुपये प्रति तोळा असा आजचा दर आहे. जवळपास 1 तोळ्यासाठी ग्राहकांना 52 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर गगनाला भिडल्यानं वायदा बाजारातही सोनं महाग झालं आहे. सोन्यासोबतच 8 वर्षात पहिल्यांदाच चांदीच्या दराने देखील उच्चांक गाठला आहे.
मागिल आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे 4 तर चांदीच्या दरात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चांदीसाठी किलोग्राममागे ग्राहकांना 64 हजार 617 रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोना व्हायरसच्या या काळात झालेली सर्वा मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर 60 हजारापर्यंत जाणार असल्याचे सराफ बाजारातील काही तज्ज्ञांचं मत आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये अशी वाढ होत राहिली तर सर्वसामान्यांना सोने खरेदी करणं आवक्याबाहेर जाऊ शकतं.
सराफा बाजारातील सोन्याच वाढलेले दर
जुलै 2020 अखेरपर्यंत प्रति तोळा 51 हजार 833 रुपये
जून 2020 – प्रति तोळा 47410 हजार
मे – 2020 – प्रति तोळा 47600 हजार
एप्रिल 2020 – प्रति तोळा 41670 हजार
मार्च 2020 – प्रति तोळा 40200 हजार 652229005751368
फेब्रुवारी 2020 – प्रति तोळा 40240 हजार
जानेवारी 2020 – प्रति तोळा 49200 हजार
आज 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 336 रुपयांनी वाधारले असून बाजार उघडताच किंमत 51 हजार 039 रुपये होती. 23 कॅरेट सोन्याची किंमत 50 हजार 835 तर 22 कॅरेटचा भाव 46 हजार 752 आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 38279 इतका आहे. 16 मार्चपासून सोमवारपर्यंत सोन्याच्या दरात 32 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.