नवी दिल्ली : वृत्तसंस्था- दिल्लीच्या सराफा बाजार सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे शनिवारी सोने १० रुपयांनी वाढून ३९,४५० प्रति किलोग्रॅम वर पोहोचले आहे. सोबतच चांदी १६५ रुपयांनी वाढून ४५,८४० प्रति किलो ग्रॅमवर पोहोचली आहे. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये नोव्हेंबर ८ पासूनची ही सर्वोच्च पातळी आहे.
व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नसराईच्या काळात सोन्याला जास्त मागणी असते, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात निरंतर होणाऱ्या घसरणीमुळे स्थनिक बाजारातदेखील याचा परिणाम दिसू लागला आहे. लंडन आणि न्यूयॉर्क कडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोने १. १० डॉलर ने घसरून १,४६७. ८५ डॉलर प्रति औंस पोहोचले आहे.
डिसेंबरमध्ये सोन्याचे वायदेही ४. ७० डॉलर ने घसरून १.४६८. ७० डॉलर प्रति औंसवे पोहोचले आहे. तर चांदी ०.०३ डॉलर च्या घसरणीसोबत १६.९४ डॉलर प्रति औंस वर पोहोचले आहे.
Visit : bahujannama.com