बहुजननामा ऑनलाईन – बकरी ईदच्या निमित्ताने जगभरात लाखोपेक्षा जास्त बकऱ्यांचा बळी दिला जातो. अशाच एका प्रसंगी ब्रिटनमधील एका महिलेला बकऱ्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा झाली, बकऱ्यासोबत सेल्फी घेण्याच्या नादात या महिलेसोबत एक वेगळाच प्रकार घडला.
सेल्फी घेण्यासाठी महिला बकऱ्याजवळ पोहोचताच बकऱ्याने तिच्याकडे येण्याचा प्रयत्न सुरू केला, पण दोरीने बांधल्यामुळे बकरा त्या महिलेपर्यंत पोहोचू शकत नव्हता.
एकीकडे मुलगी सेल्फी काढण्यात व्यस्त असताना बकरा त्या मुलीला आपला बळी ठरवण्याचा प्रयत्न करीत होता. बकऱ्याने एक पाऊल मागे टाकले आणि सेल्फी काढण्यात व्यस्त असलेल्या महिलेला शिंगेने जोरात धडक दिली.
बकरीच्या या अचानक हल्ल्यामुळे तिला धक्का बसला आणि तिथेच पडली. बकऱ्याने तिच्यावर हल्ला का केला हे त्या महिलेला समजले नाही. बकरीचा हल्ला इतका जोरदार होता की, त्या महिलेच्या डोक्याला खूप दुखापत झाली व ती तिथेच पडली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक म्हणत आहेत की बकऱ्याला मुलीचा सेल्फी घेणे आवडत नाही.